द पॉईंट नाऊ ब्युरो : अर्थमंत्री निर्मला सीतारामन
आज (१ फेब्रुवारी) ११ वाजता अर्थसंकल्प सादर करतील. संपूर्ण देशाच्या नजरा लागून आहेत, यावेळी देखील हा अर्थसंपकल्प पेपरलेस (Paperless Budget) असणार आहे. गतवर्षी करोनामुळे कागदपत्रांशिवाय अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात करण्यात आली होती. यावेळी ओमायक्रॉनचं संकट असल्याने यावर्षीही त्याच पद्धतीने अर्थसंलकल्प मांडला जाणार आहे.
अर्थसंकल्प तुम्ही मोबाईल फोनवर (Mobile Phone) देखील पाहू शकता. यासाठी अर्थसंकल्प मंत्रालयाने एक मोबाइल अॅप आणलं आहे. हे मोबाईल अॅप अॅड्रॉईड (Android) आणि आयओएस (IOS) दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. संपूर्ण अर्थसंकल्प या अॅपवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असेल.
कसे डाऊनलोड करायचे?
१) युनियन बजेट मोबाईल अॅप तुम्ही http://indiabudget.gov.in या वेबसाईटवरून डाऊनलोड करु शकता.
२) तसेच गुगर प्ले स्टोरवरूनही हे अॅप डाऊनलोड करता येते.
डिजिटल संसद अॅपवरही मिळणार माहिती
या बजेट मधून सर्वसामान्य नागरिकांना आता केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती डिजिटल संसद अॅपवरूनही घेता येणार आहे. या अॅपवर अर्थसंकल्पाचे लाईव्ह अपडेट्स पाहू शकता. तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाजही लाईव्ह पाहता येईल. १९४७ सालापासून ते आतापर्यंतचे अर्थसंकल्प आणि त्यावरील चर्चा यांची माहिती या अॅपवर मिळेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम