द पॉईंट नाऊ ब्युरो : राज्यात आजपासून अनेक ठिकाणी निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. याबाबत नवी नियमावली देण्यात आली आहे.
स्विमिंग पूल, वॉटर पार्क, हॉटेल, थिएटर, सलून, स्पा यांना पन्नास टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची आता परवानगी असणार आहे. तसेच हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू राहू शकतील. 11 जिल्ह्यांमध्ये हे नवीन नियम लागू असतील.
दरम्यान, अंत्यविधीसाठी असणारी उपस्थितीची अट आता नसणार आहे. आता अंत्यविधीसाठी कोणतीही मर्यादा नसेल. तर लग्न समारंभासाठी 200 लोकांना परवानगी असेल.
राज्यातील पर्यटन स्थळे आता पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने, पॉझिटिव्हीटी रेट काकी झाल्याने राज्य सरकारने ही सूट दिलेली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम