पुणे प्रतिनिधी : जगात भारताची मान उंचावणारा ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता खेळाडू नीरज चोप्राच्या नावाने यापुढे पुण्यातील आर्मी स्टेडियम ओळखले जाणार आहे. यामुळे नीरज चोप्राच्या नावाने हे स्टेडियम ओळखले जाणार आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सोमवारी हा नामकरण सोहळा पार पडणार आहे.
भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून पुण्यातील आर्मी स्टेडियमला नीरज चोप्राच नाव दिलं जाणार आहे. तसेच टोकिओ ऑलिम्पिकमधे पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचा यावेळी सत्कारही करण्यात येणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह सोमवारी सकाळी पुण्यात येणार आहेत. लष्कराच्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या संस्थेच्या सर्वसाधारण सभेस उपस्थित राहणार असून त्यानंतर संध्याकाळी चार वाजता आर्मी स्टेडीयमचा नामकरण सोहळा होणार आहे. यानंतर अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम