फसव्या प्रेमाने घात केला; नराधमांनी 17 वर्षीय तरुणीवर केला सामूहिक बलात्कार

0
46

द पॉईंट नाऊ ब्युरो : एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्याची घटना घडली आहे. मागील काही दिवसांत बलात्काराच्या सलग घटनांनी महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे.

एका 17 वर्षीय पीडितेवर ही सामूहिक अत्याचाराची घटना रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यात घडली आहे. पीडित तरुणी पेण तालुक्याच्या वाशी परिसरात एका ठिकाणी हळदी समारंभाच्या कार्यक्रमासाठी आलेली होती. इथे दोघांनी तिच्याशी ओळख करून घेतली. ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले आणि पुढे तिचा गैरफायदा घेत, तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. तर अद्यापही दहा ते बारा जण फरार असल्याचे बोलले जात आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, पोलीस फरार संशयितांचा शोध घेत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here