वाखारीत ‘सर्पदंशाने’ शेतकऱ्याचा मृत्यू ; परिसरात हळहळ

0
43

देवळा प्रतिनिधी : वाखारी ता.देवळा येथील प्रगतीशील शेतकरी संतोष तुळशीराम भदाणे ( वय ६५ ) यांचा सर्पदंशाने बुधवार (दि.१८) रोजी मृत्यू झाला. या आकस्मिक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत वृत्त असे कि, वाखारी येथील संतोष तुळशीराम भदाणे हे काल सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास भुईमुगाचा पाला घेण्यासाठी शेतात गेले असता त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटाला विषारी सर्पाने दंश केला. त्यांना तातडीने देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करत उपचार केले परंतु परिस्थिती चिंताजनक झाल्याने त्यांना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेले असता तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन करून सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पत्नीचे सात महिन्यापूर्वी निधन झाले होते. काही महिन्याच्या अंतरात पती-पत्नीचे निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात 3 मुले ,सुना, नातवंडे असा परिवार आहे.

– पत्रकार सोमनाथ जगताप


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here