द पॉईंट नाऊ ब्युरो : पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तसेच आमदार सुनील भुसारा यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व तालुकाध्यक्षांना चारचाकी गाड्या भेट म्हणून दिल्या.
सुनील भुसारा यांनी आपल्या स्वखर्चातून या गाड्या तालुकाध्यक्षांना वाटल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते या गाड्या तालुकाध्यक्षांना सोपवण्यात आल्या.
भुसारे यांच्या या विशेष भेटीमुळे जिल्ह्यातील सारे तालुकाध्यक्ष अजून जोमाने पक्षाच्या कामाला लागणार हे नक्की.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम