द पॉईंट नाऊ ब्युरो : आधी नराधमांनी अब्रू लुटली आणि नंतर त्यावर महिलांनी पीडितेला छळ छळ छळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दिल्ली येथे एका तरुणीवर अवैध दारूचा धंदा करणाऱ्या नराधमांनी आधी बलात्कार केला. आणि त्यानंतर परिसरातीलच महिलांनी पीडित तरुणीचे टक्कल केले, तोंडाला काळे फासले, चपलांचा हार घालून तिला परिसरात फिरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार घडलेला व्हिडीओ दिल्ली येथील महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी ट्विटरवर शेअर केलेला आहे. ज्याद्वारे ही बाब समोर आली आहे.
या प्रकरणी चार जणांना अटक देखील करण्यात आली आहे. मात्र आता पोलिसांच्या अंतिम तपसानंतरच सारे काही स्पष्ट होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम