द पॉईंट नाऊ ब्युरो : प्रत्येक राज्यातील सरकार आपल्या राज्यातील जनतेला खुश करण्यासाठी म्हणा किंवा जनतेसाठी काही ना काही योजना आणत असते.
झारखंड राज्यात 26 जानेवारीचा मुहूर्त साधून इथल्या राज्य सरकारने रेशनकार्ड धारकांना पेट्रोल स्वस्त देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांच्याकडे लाल, पिवळे, हिरवे रेशन कार्ड असेल, ज्यांच्याकडे झारखंड राज्य नोंदणीची दुचाकी असेल अशांना पेट्रोल सबसिडी योजनेअंतर्गत 10 लिटर पेट्रोलसाठी 250 रुपये मिळणार आहेत. जी थेट बँक खात्यात जमा होईल. अर्थात, अशा लोकांना पेट्रोल लिटरमागे जवळपास 25 रुपये स्वस्त पडणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम