देवळा प्रतिनिधी : लोहोणेर येथील मविप्रच्या मराठा जनता विद्यालयात ७३वा भारतीय प्रजासत्ताक दिन कोविडचे नियम पाळून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष अनिल आहेर, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख,शालेय समिती सदस्य रतीलाल परदेशी, पंडित निकम, रमेश आहिरे,रेश्मा महाजन, अविनाश महाजन, संजय सोनवणे,पंडित पाठक,योगेश पवार, डॉ.रविंद्र शेवाळे,अशोकसिंग परदेशी,माता पालक संघाच्या उपाध्यक्ष रुपाली धामणे,पोपट उशीरे,जितू पाटील, आदींसह मुख्याध्यापक वाय.यु बैरागी, पर्यवेक्षक बी.के.जाधव आणि राकेश थोरात आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. बी.एखंडे यांनी केले.
त्यानंतर राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले तर स्काऊट गाईडचे ध्वजारोहण भारतीय सैन्यातील जवान व विद्यालयाचा माजी विद्यार्थी अविनाश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण गुगल मीटद्वारे विद्यार्थ्यांसाठी तंत्रस्नेही शिक्षक एस.बी.एखंडे यांनी केले. त्यांना सचिन रौंदळ यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक वृंदांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एस. बी. एखंडे यांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम