द पॉईंट नाऊ ब्युरो : एका अल्पवयीन मुलीने तिच्यावर 19 जणांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
उत्तर प्रदेशातील ललीतपुर येथे ही घटना समोर आली आहे. आपल्यावर चार वर्षांपासून अत्याचार करण्यात आल्याचे 17 वर्षीय पीडित मुलीने सांगितले आहे. आरोप करण्यात आलेल्या संशयितांमध्ये समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. संशयितांमध्ये 17 जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोन जण फरार आहेत.
या घटनेने उत्तर प्रदेशातील राजकीय गोटात देखील खळबळ उडाली आहे. पुढे निवडणुका येऊन ठेपल्याने राज्यात या प्रकरणामुळे राजकीय गोटात झोप उडाली असणार हे नक्की. आता यातील तपासातून काय पुढे येते? हे लवकरच स्पष्ट होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम