नाशिक प्रतिनिधी : शिक्षण विभागातील लाखचोर प्रकरणातील संशयित आरोपी डॉ वैशाली झनकर यांची प्रकृती खालावल्याने काल (दि 17) जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने आज (दि.18) त्यांना अधिक तपासणी साठी संदर्भ रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
झनकर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल
दरम्यान, त्यांच्या भोवती त्यांचे पती आणि इतर नातेवाईकांनी गर्दी केली होती. रुग्णवाहिकेपर्यंत डॉ. झनकर व्हिलचेयरवर आल्या. त्यानंतर त्या स्वतः उभ्या राहून रुग्णवाहिकेमध्ये चढल्याने उपस्थित आश्चर्यचकित झाल्याचे यावेळी दिसून आले. नेमकं तबियत बिघडली की ढोंगीपणा सुरू केला अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे.
डॉ झनकर यांना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे हे अजूनही न उमगलेले गूढ आहे. यांच्यासोबत असलेले पोलीसही यावेळी बघ्यांच्या भूमिकेत दिसले. दरम्यान, डॉ झनकर यांना काल (दि. 18 ) रोजी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
वकिलांनी केलेला अंतरिम जामिनासाठी अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर त्यांची रवानगी थेट सेंट्रल जेलला होणार होती. मात्र, जामीन फेटाळल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडी कायम राहिली. याच वेळी अचानक प्रकृती खालावली आणि त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हा ढोंगीपणा की खरच तबियत खालावली हा चर्चेचा विषय आहे. अचानक तब्बेत कशी खालावली असावी असाही प्रश्न उपस्थित होत असून यावर तर्कवितर्कांना उधान आलेले पहावयास मिळाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम