योगेश शेलार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ; नाना पटोलेंच्या उपस्थितीत प्रवेश

0
43

दिलीप बांबळे
सर्वतीर्थ टाकेद प्रतिनिधी : इगतपुरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते योगेश शेलार यांनी नुकताच आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत इंदिरा काँग्रेस पक्ष्यात जाहीर पक्ष प्रवेश केला. रविवार ता.२३ दरम्यान सकाळी १२ वाजेदरम्यान काँग्रेस नेते नानासाहेब पटोले हे इगतपुरी तालुका दौऱ्यावर आले होते.

इगतपुरी येथील ग्रीन लॅन्ड हॉटेलवर श्री.पटोले यांचे आमदार हिरामण दादा खोसकर,संदीप भाऊ गुळवे यांच्यासह इगतपुरी तालुका काँग्रेस पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. या भेटीदरम्यान सर्व कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली.
अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला दरम्यान काँग्रेस पक्ष्यात असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर पक्ष प्रवेश केल्यानंतर तालुक्यातील दलित, पीडित, वंचित, अपंग उपेक्षित घटकांच्या प्रश्नांसाठी तळागाळात जाऊन काम करू अनेक प्रलंबित प्रश्न सोडवू व काँग्रेस पक्ष्याला बळकट करण्यासाठी निश्चित सातत्याने प्रयत्न करू असे आश्वासन योगेश दादा शेलार यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण दादा खोसकर,जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे,संदीप भाऊ गुळवे, तालुकाध्यक्ष रमेश भाऊ पाटील,जेष्ठ नेते संपतराव काळे,गोपाळा लहांगे,पांडू मामा शिंदे,कचरू शिंदे,लकी भाऊ जाधव,सामाजिक कार्यकर्ते भूषण डामसे,आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यांनी केला इंदिरा काँग्रेस पक्ष्यात जाहीर पक्ष प्रवेश :
सामाजिक कार्यकर्ते योगेश दादा शेलार,लकी भाऊ गोवर्धने,किशोर शेलार,संदीप कोकणे,संतोष पवार,समाधान गोवर्धने, सचिन गोवर्धने, राहुल गायखे,अमोल कोकणे,अनिल कोकणे,आप्पा कोकणे,शांताराम शेलार,उत्तम गोवर्धने,योगेश गोवर्धने,राहुल गोवर्धने,दीपक शेजवळ,दत्तू कोकणे,ज्ञानेश्वर कोकणे,सुदाम शेलार,सतीश खरे,प्रशांत सावंत, मुकेश भगवाने, सोनू कोकणे
आदींसह योगेश दादा शेलार मित्र समूह महाराष्ट्र राज्य पदाधिकारी कार्यकर्ते व अनेक तरुणांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

“तालुक्यातील जनसामान्यांचे विविधांगी प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस नेते नाना पटोले,भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात माझ्या असंख्य मित्र परिवारासह मी जाहीर पक्ष प्रवेश केला असून येणाऱ्या काळात तळागाळातील गोरगरीब जनसामान्यांचे सामाजिक प्रश्न सोडवून काँग्रेस पक्ष्याला बळकट करून पक्ष वाढीसाठी काम करणार आहे.”
8

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here