जाणीव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा रविवारी( दि २३) रोजी तिसरा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा

0
36
संस्थेचे चेअरमन व नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक जितेंद्र आहेर ,सौ सुलभा आहेर यांचा सत्कार करताना संचालक लक्ष्मीकांत आहेर समवेत संस्थापक भाऊसाहेब पगार ,व्हा चेअरमन राजीव पगार , समाधान आहेर,दावल आहेर आदी (छाया -सोमनाथ जगताप )

देवळा प्रतिनिधी : देवळा येथील जाणीव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा रविवारी( दि २३) रोजी तिसरा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यानिमित्ताने संस्था कार्यालयात शुभम आहेर यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा करण्यात आली . तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या यांच्या जयंती निमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले .

संस्थेचे चेअरमन व नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक जितेंद्र आहेर ,सौ सुलभा आहेर यांचा सत्कार करताना संचालक लक्ष्मीकांत आहेर समवेत संस्थापक भाऊसाहेब पगार ,व्हा चेअरमन राजीव पगार , समाधान आहेर,दावल आहेर आदी (छाया -सोमनाथ जगताप )

यावेळी सभासद, ठेवीदार तसेच हितचिंतकांनी उपस्थित राहून ,संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या . तसेच संस्थेचे चेअरमन जितेंद्र आहेर , सौ सुलभा आहेर यांची देवळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक प्रचंड मताधिक्याने निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला . याप्रसंगी संस्थापक भाऊसाहेब पगार, ,व्हा चेअरमन राजीव पगार,संचालक सर्वश्री लक्ष्मीकांत आहेर,सतीश कोठावदे , कैलास देवरे,समाधान आहेर, नरेंद्र हिरे, सुनील आहेर, वसंत आढाव ,योगेश सावकार, डॉ सतीश वाघ,रघु नवरे ,मेघा भदाणे ,योगिता सूर्यवंशी आदींसह व्यवस्थापक दिलीप आहेर, शुभम आहेर, शरद खैरणार, योगेश निकम ,दीपक आहेर आदी कर्मचारी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here