सर्वसामान्य कुटुंबातील ‘भूषण’ ठरला तालुक्याचे ‘भुषण’

0
19

देवळा प्रतिनिधी : सर्वसामान्य कुटुंबातील भूषण जेव्हा जनतेचे भूषण बनते तेव्हा तो घामाच्या माथी विजयाचा गुलाल लावत असतो, होय हे खरं आहे भाजपा जिल्हाध्यक्षांनी ठरवले अन अतिशय नवखा उमेदवार देवळ्याचा वॉर्ड क्रमांक 2 मध्ये दिला. उमेदवार असा होता की ज्याला प्रचारासाठी स्वतःकडे पैसे नव्हते. मात्र लोकवर्गणीतूनच त्याचे डिपॉझिट अन प्रचारपत्रके व बॅनर देखील लोकवर्गणीतूनच झाले.

होतकरू तरुण उभा राहतोय म्हणून प्रत्येक मतदाराला आपल्या घरातील कोणी उमेदवार आहे अशी भावना या वॉर्डात होती, निवडणूक म्हटलं की फार मेहनत घ्यावी लागते सकाळी प्रचार तर रात्री पार्टीचा फड रंगत असतो, मात्र देवळा शहरात हा उमेदवार या सरव्याला अपवाद ठरला साधा चहापाण्याचा देखील खर्च करण्याची वेळ भूषणवर आली नाही. लोकवर्गणीतूनच त्याचा प्रचार केला गेला आणि तो घवघवीत यशाचा मानकरी ठरला. विजयश्री त्याने खेचून आणला.

कुठलीच निवडणूक लढविणे सर्वसामान्यांच्या अवाक्यात राहिलेले नसताना देवळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत शेतमजूर कुटूंबातील उमेदवाराने मिळविलेला विजय चर्चेचा आणि तितकाच कौतुकाचा ठरला आहे. मतदारांनी स्वतःच्या खांद्यावर निवडणूक घेत भूषण बाळू गांगुर्डे या २६ वर्षाच्या तरुणाला जिंकून आणले.

केदा आहेर यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास अभूतपूर्व आहे. मी त्यांचे ऋण कधीही फेडू शकत नाही, सर्वसामान्य युवकाला नानांचा स्पर्श झाल्याने नगरसेवक बनलो असे म्हणत केदा आहेर यांनी दाखवलेला विश्वास कधीही न डगमगता पूर्ण करेल, जनतेच्या प्रेमाला कामातून परतफेड करेल असे देखील भूषण ‘द पॉईंट नाऊ’ शी बोलतांना म्हणाला.

प्रभाग २ मधून भुषण मनमिळावू स्वभाव व कुणाच्याही गांगुर्डेचा विजय लक्षवेधी ठरला आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची मोडकळीस आलेले घर, आई-वडिल शेतमजूर अशा अतिसामान्य कुटूंबातील भुषणने एका खाजगी मदतीला धावून जाण्याची वृत्ती यामुळे त्याने परिसरातील जनतेची आपुलकी मिळविली. परिणामी प्रभागातील प्रतिष्ठीत नागरीकांनी भुषणला उमेदवारीसाठी भाजप नेतृत्वाकडे आग्रह धरला. भूषण हा रूग्णालयात अल्पशा पगारावर काम करणारा युवक त्याला निवडून आणण्याची जबाबदारी नागरिकांनी स्वीकारली. अन निवडून देखील आणले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here