ती सापडलेली कौटि अन हाडे नेमकी कशाची? ; गूढ उकलणार

0
52

द पॉईंट नाऊ ब्युरो : मालेगाव येथील वाडिया रुग्णालयात सापडलेल्या मानवी कौटि अन हाडांमुळे गूढ वाढले आहे. आता याची फॉरेन्सिक चाचणी केली जाणार आहे.

मालेगाव येथे वाडिया रुग्णालयात नूतनीकरण काम सुरू असतांना एका बंद खोलीत कौटि आणि हाडे सापडली. यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर अद्याप देखील पालिका प्रशासनाद्वारे तक्रार दाखल केली गेली नसल्याने, उलट सुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.

दरम्यान, यासंबंधीत तपास करण्यासाठी आता पालिका प्रशासन सापडलेली हाडे मुंबई येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवणार आहे. ही हाडे नेमकी मानवी आहेत की इतर कुठल्या प्राण्याची हे त्यानंतरच स्पष्ट होईल.

हाडे सापडलेल्या खोलीत पूर्वी शवविच्छेदन केले जात होते. ही खोली मागील मोठ्या कालावाधीपासून बंद होती. आता ही हाडे नेमकी मानवी की इतर कुठल्या प्राण्याची हे तपासाअंतीच निष्पन्न होईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here