महालपाटणेच्या उपसरपंच पदी योगेश अहिरे

0
42
महालपाटणे ता देवळा येथील नूतन उपसरपंच निर्मला आहिरे यांच्या समवेत सरपंच , सदस्य आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा प्रतिनिधी : महालपाटणे (ता.देवळा) येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी आवर्तनानुसार विद्यमान उपसरपंच योगेश आहिरे यांनी राजीनामा दिल्याने त्याजागी निर्मला शांताराम अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

महालपाटणे ता देवळा येथील नूतन उपसरपंच निर्मला आहिरे यांच्या समवेत सरपंच , सदस्य आदी (छाया – सोमनाथ जगताप )

सरपंच सुमनताई अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांची सभा घेण्यात आली.त्यात सर्वानुमते निर्मला आहिरे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच दादाजी आहिरे, ग्रामपंचायत सदस्य किरण आहिरे, तुषार कुलकर्णी, योगेश आहिरे, बाळासाहेब खरोले, काजल खरोले व इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. जनसेवा पॅनलचे संस्थापक अध्यक्ष दादाजी आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली महालपाटणे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच व उपसरपंच यांच्या कार्यकाळात अतिशय लोकाभिमुख व उपयुक्त कामे झाल्याने याप्रसंगी मावळते उपसरपंच योगेश आहिरे यांचा सत्कार करण्यात आला.

योगेश आहिरे यांनी शेतशिवरामधून पांद्या मोकळ्या करून काही ठिकाणी पक्के रस्ते बनवले, सभामंडप, दलित वस्तीचे विकास कामे,ठक्कर बाप्पा योजना, विविध प्रकारची कामे मार्गी लावली. याकामी त्यांना ग्रामपंचायत सदस्य तुषार कुलकर्णी व किरण अहिरे यांचे सहकार्य लाभले. यावेळी सुरेखा ठाकरे,राधा गांगुर्डे, गणेश बच्छाव, युवराज शेलार, चिकू अहिरे,शांताराम अहिरे, सागर खरोले, गोरख अहिरे, वसंत भाटेवाल, सुनील निकम ,उत्तम बच्छाव, दिलीप अहिरे व ग्रामस्थांनी उपस्थित राहून उपसरपंच निर्मला अहिरे यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here