द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : लाचखोर अधिकारी झनकर यांना आज पुन्हा उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे त्यांची तबियत पुन्हा पुन्हा बिघडते कशी असा सवाल सर्वसामान्य करत आहेत.
आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. जामिनासाठी त्यांनी अर्ज केला असून त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. यामुळे उद्याच्या सुनावणीकडे लक्ष लागून आहे.
गेल्या आठवड्यात न्यायालयाने शनिवारी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यादरम्यान प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. यानंतर सोमवारी (दि १६) रोजी त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा त्यांची तबियत खालावली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम