वेल्डिंग करत असतांना झालेल्या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू

0
31

द पॉईंट नाऊ ब्युरो : भुसावळ तालुक्यातील सुनसगाव शेजारी असलेल्या एका कंपनीत ऑईलने भरलेल्या टाकीचा स्फोट झाल्या व मोठा अपघात घडला अपघातात दोन मजूरांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.

मयत झालेल्या मजुरांमध्ये एक मध्यप्रदेशातील व दुसरा भुसावळ येथील असल्याचे समजते. सुनसगाव जवळील या फॅक्टरीत ऑईलने भरलेल्या टाकीला सदर मजूर हे वेल्डींगचे काम रीत असताना स्पार्कींग हेवून मोठा स्फोट झाला व या स्फोटात दोन्ही मजुरांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे सपोनी प्रकाश वानखेडे व पोलीस कर्मचारी यांनी भेट देवून माहिती घेतली.

एका फॅक्टरीत वेल्डींग करीत असतांना झालेल्या स्फोटात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. दुपारी १ वाजेच्या सुमारास घडलेल्‍या घटनेतील मयतांत मध्यप्रदेशासह भुसावळातील मजुराचा समावेश आहे.

सुनसगाव रस्‍त्‍यावरील दिया कॉपर मास्टर अलायन्स कंपनीत आज दुपारी एक वाजेच्या सुमारास सदर स्‍फोट झाला. फॅक्टरीतील भरलेल्या ऑईल टाकीला दोन मजुर वेल्डींगचे काम करीत असतांना अचानक स्पार्किंग होवून मोठा स्फोट झाला. या घटनेत काशिनाथ सुरवाडे, खेमसिंग पटेल या दोन मजुरांचा जागीच मृत्यू (Death) झाला. स्फोटाच्या आवाजाने परीसरात मोठा आवाज झाल्याने अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here