द पॉईंट नाऊ विशेष : राजकारण म्हटले की आजकाल सामान्य नागरिक बहुधा नाके मुरडतात. मात्र राजकारणातही असे बहुतांश लोक असतात, जे राजकारणात येऊन समाजकारण करण्याचा मनसुबा पाळतात आणि त्याप्रमाणेच वागून सामान्यांसाठी नेहमी वेगवेगळे प्रयत्न करताना दिसतात.
नाशिकच्या बागलाण तालुक्यातल्या ताहाराबाद येथिल श्री. मिलिंद सुधाकर चित्ते हे असंच एक वेगळं व्यक्तिमत्व. मिलिंद चित्ते हे महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. मिलिंद चित्ते, हे एका सर्वसाधारण कुटुंबातील एक साधसं व्यक्यिमत्व. त्यांचे आजोबा दशरथ चौधरी (चित्ते) आणि वडील सुधाकर चित्ते यांचा मिरची विकण्याचा व्यवसाय होता.
या चित्ते कुटुंबातील मिलिंदजी चित्ते यांनी M. B. A. पर्यंत आपलं शिक्षण घेतलं. या शिक्षणदरम्यानच त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. B.Com चं शिक्षण घेत असतांना, विषय शिक्षक नसल्या कारणाने त्यांनी आंदोलन केलं. आणि परिणामस्वरूप त्यांना विषय शिक्षक देखील मिळाले.
त्यांच्या या कार्याने प्रभावित होऊन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाद्वारे त्यांना राजकारणात पाऊल ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं. 2005 मध्ये त्यांना ताहाराबाद शहराध्यक्ष पदाची पहिली जबाबदारी मिळाली. NSUI या विद्यार्थी संघटनेचे कार्य करत असताना, विद्यार्थी दत्तक योजनेत त्यांनी वैयक्तिक 100 विद्यार्थ्यांची जबाबदारी घेतली. त्यांना सर्व त्या शैक्षणिक बाबी पुरवल्या.
2009 ते 2012 कालावधीसाठी बागलाण तालुका युवक काँग्रेस सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. युवकांच्या रोजगाराचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या बसचा प्रश्न असे युवा वर्गाचे प्रश्न सोडवत जाऊन त्यांनी लक्ष वेधून घेतले. त्यांच्या कामामुळे त्यांची धुळे लोकसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली.
त्यांच्या कार्याचा धावता आलेख बघता त्यांना उत्तर महाराष्ट्र सोशल मीडियाचे प्रमुख बनवण्यात आले.
पुढे त्यांची बागलाण तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाली. महाराष्ट्र सचिव पद निवडणुकीत चांगल्या मताधिक्याने निवडून आले.
‘चलो पंचायत’ अभियान अंतर्गत त्यांनी गावोगावी जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. पुढे त्यांची महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
श्री. मिलिंद चित्ते यांनी आपल्या आजवरच्या राजकीय कार्यकाळात स्थानिक प्रशासन पासून केंद्र सरकार पर्यंत सर्वांनाच धारेवर धरले.
श्री. मिलिंद चित्ते यांच्या याच कार्याची दखल घेत, *द पॉईंट नाऊ* वृत्त समूहातर्फे 2021-22 चा राजकीय क्षेत्रातील राज्यस्तरीय *’द इंस्पायरिंग युथ’* पुरस्कार देतांना विशेष आनंद होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम