द पॉईंट नाऊ ब्युरो : “दारू ही औषधासारखी आहे. त्यामुळे मर्यादित प्रमाणात सेवन करण्यास काही हरकत नाही.” असे भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.
भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर या सर्वांना परिचित आहेत. मालेगाव बॉम्बफोट प्रकरणात त्यांचे नाव आले होते. त्यामुळे त्यांना कोणी ओळखत नाही, असे नाहीच. त्या त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात.
आता प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दारू वर वक्तव्य केले आहे. आणि त्यामुळे ते चर्चेत आले आहे. दारू योग्य प्रमाणात सेवन केली तर ते औषध आहे आणि जास्त प्रमाणात सेवन केली तर ती विष आहे. असे वक्तव्य प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले. हे वक्तव्य करतांना त्यांनी आयुर्वेदाचा हवाला दिला.
दारू ही शरीराला घातक असते. आणि दारूने आजवर अनेकांना देशोधडीला देखील लावले आहे. त्यामुळे दारू बाबत जवळपास बहुतांश जण नाक मुरडतात. मात्र दारू प्रेमींची संख्या देखील काही कमी नाही.
मात्र प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या या वक्तव्याने आता नवीनच चर्चा झाली आहे. प्रज्ञासिंह यांच्या या वक्तव्याला आता कोण काय प्रतिक्रिया देते? याकडे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम