एस. टी. महामंडळाने बस सुरू करण्यास काढला तोडगा

0
44

द पॉईंट नाऊ ब्युरो : एस. टी. महामंडळाने आता एक नवीन तोडगा बस सुरू ठेवण्यासाठी शोधून काढला आहे. आता एस. टी. बसचे चालक म्हणून यांत्रिक कर्मचारी आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांचा, तर वाहक म्हणून वाहतूक नियंत्रक यांचा वापर केला जाणार आहे.

मागील मोठ्या कालावाधीपासून सुरू असलेल्या एस. टी. बस कर्मचाऱ्यांच्या संपावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही. काही कर्मचारी कामावर परतले आहेत. मात्र अद्याप मोठ्या प्रमाणावर कर्मचारी संपात सामील आहेत.

या संपामुळे एस. टी. महामंडळाला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत आहे. वारंवार आवाहन करून देखील संपकरी सॅम्प मागे घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे आर एस. टी. महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत परिपत्रक देखील काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here