नितीन फंगाळ
चांदवड प्रतिनिधी : महंत गंगापुरीजी महाराज , महंत प्रभातपुरीजी महाराज , महंत बन्सीपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनात सालाबादप्रमाणे चंद्रेश्वरबाबा संयुक्त पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला.
पुण्यतिथी पुर्वसंध्येला ह.भ.प. तुकाराम महाराज जेऊरकर यांचे जाहिर किर्तनाने सोहळा सुरू झाला. बुधवार दि. १९ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ०६ वा. श्री चंद्रेश्वर महादेव भगवान अभिषेक , सकाळी ०७ वा. चंद्रेश्वरबाबांच्या दोन्ही समाधींचे पुजन , स. ०८ चंद्रेश्वरबाबा पालखी मिरवणूक सोहळा चंद्रेश्वरगड येथे होऊन , स. ८.३० वा. श्री सप्तऋषी समाधी पुजन करण्यात येऊन मिरवणूक सोहळा संपन्न झाला. स. ११ वा. महाप्रसाद भंरा-याचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्याप्रसंगी महंत रामचंद्रपुरी( नागापुर ) , स्वामी अजयपुरीजी ( त्र्यंबकेश्वर ) , स्वामी राजेंद्रपुरीजी , स्वामी डॉ नागराजपुरीजी महाराज ( नाशिक ) , स्वामी गणेसपुरीजी महाराज ( देवळा / देवदारेश्वर ) व अनेक संत-महंत व भाविक भक्तगण उपस्थित होते. पुण्यतिथी सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराच्या वतीने परिश्रम घेण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम