राहुड घाटामध्ये तिहेरी अपघात भाजीपाला घेऊन जाणारे आई व मुलगा गंभीर जखमी

0
36

नितीन फंगाळ
चांदवड प्रतिनिधी : पहाटे 4 वाजेच्या दरम्यान राहुड घाटामध्ये तिहेरी अपघात झाल्याची घटना घडलेली आहे, उत्तरप्रदेश ला जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने घाटातील शेवटच्या वळणावर तो दुभाजकावर आदळला त्यामागून टाटा छोटा हत्ती येत असताना मागून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने या छोटा हत्ती ला जोरदार धडक दिल्याने अपघातग्रस्त ट्रक वर जाऊन आदळला या मध्ये छोटा हत्ती मध्ये असणारे रमण दत्तू पडोळ वय 28 व आई राजाबाई दत्तू पडोळ वय 55 राहणार पन्हाळे यांच्या पायाला गंभीर दुःखापत झालेली आहे. रमन पडोळ हे भाजीपाला घेऊन मालेगावच्या दिशेने जात होते.

छोटा हत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे, अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

अपघाताची माहिती सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्तळी येऊन दोरीच्या साह्याने गाडीची केबिन सरळ करत रमण पडोळ व त्यांच्या आईला बाहेर काढले व कंपनीच्या एंबूलन्स मध्ये चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. यावेळी शशिकांत पवार, विनोद बागुल, निजान शेख, लतीफ शेख, अंबादास बिरारी, संजय खैरनार, गनेश सोनवणे, व इतर नागरिक उपस्थित होते.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here