नितीन फंगाळ
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यालयात भूगोल दिवस साजरा करण्यात आल्याची बातमी विद्यालयाच्या प्राचार्य डॉ सौ संगीता आर बाफना यांनी दिली.
प्रा सी डी देशपांडे यांच्या स्मरणार्थ संपूर्ण भारतात भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधत विद्यालयाचे उपप्राचार्य एस यू समदडीया यांनी प्रा.सी.डी.देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. विद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख सौ.एस के भामरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करत भूगोल विषयाचे महत्त्व विशद केले. विद्यालयातील विद्यार्थीनी कु.अंजली पाटील व कु.शिवानी गायकवाड यांनी आपल्या भाषणातून भूगोल आणि दैनंदिन जीवन याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील उपशिक्षक श्री एच पी मोरे यांनी भूगोल विषयाचे महत्व सांगणारी कविता सादर केली. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ एस.आर. बाफना उपप्राचार्य एस यूसमदडिया पर्यवेक्षक श्री आर एम पवार तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम