24 जानेवारीपासून महाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरू

0
49

द पॉईंट नाऊ ब्युरो : अखेर महाराष्ट्रात 1 ली ते 12 वी पर्यंतच्या सर्व शाळा येत्या 24 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली.

राज्यभरातील शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता. मात्र शासनाच्या या निर्णयाला विरोध करत राज्यभरातून शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली गेली होती. याबाबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मात्र याबाबत सर्वस्वी निर्णय स्थानिक प्रशासन व्यवस्थेकडे सोपवण्यात आले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here