गुलाल कुणाचा ? आज फैसला ; वेगवान व अचूक निकाल फक्त ‘द पॉईंट नाऊ’वर

0
31

द पॉईंट नाऊ ब्युरो : जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज लागणार असून नेमका गुलाल कुणाचा आहे याचा फैसला आज होणार आहे. सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरवात होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील देवळा, कळवण, पेठ, सुरगाणा, निफाड , दिंडोरी या नगरपंचायतीचा निकाल लागणार असून ग्रामीण महाराष्ट्राच्या चाव्या कुणाच्या हातात याचा फैसला होणार आहे. यामुळे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले असून निर्णायक क्षण येऊन ठेपला आहे. सर्वच नेत्यांचा कस लागला असून काही वेळातच निर्णय मोकळा होणार आहे.

देवळा नगरपंचायत अटीतटीची झाली असून याठिकाणी धक्कादायक निकाल येण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्याचे लक्ष या नगरपंचायतकडे लागून आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचा देखील कस या ठिकाणी लागला आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमारांच्या सभा देखील आक्रमक झाल्या असल्याने नेमकं सभेनी काही गणिते बिघडवले का हे देखील थोड्याच वेळात समजणार आहे.

सर्व निकाल thepointnow.in या वेबसाईटवर असणार आहेत.

https://www.facebook.com/thepointnow/


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here