द पॉईंट नाऊ ब्युरो : मुंबईमध्ये एक भयंकर स्फोट झाला आहे. यात तीन सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई येथे नेव्हल डॉकयार्डवर आयएनएस रणवीर वर स्फोट झाला. या स्फोटात तीन नौदल जवानांचा मृत्यू झाला. या स्फोटामागील कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
या स्फोटामुळे कुठलीही आग लागली नाही. त्यामुळे अधिक नुकसान झाले नाही. मात्र तीन नौदल जवानांना यात आपले प्राण गमवावे लागले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम