द पॉईंट नाऊ ब्युरो : पाणी गरम करण्याच्या गिझरमुळे दोघा मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बंगळुरू मध्ये हा दुर्दैवी प्रकार घडला.
माणूस जसा जसा पुढे जात आहे, तसा अधिकाधिक आधुनिक सेवांचा वापर करू लागला आहे. मात्र हीच आधुनिक उपकरणे मनुष्य जीवनाला घातकही ठरतात.
बंगळुरू मध्ये घरात बसवलेल्या गिझरमधून विषारी कार्बन मोनो ऑक्साइड गॅस लिक झाल्याने जीव गुदमरून या मायलेकींचा मृत्यू झाला. या दोघींचेही मृतदेह बाथरूममध्ये आढळून आल्याने, पोलिसांनी गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.
या प्रकाराने एक बाब लक्षात येते ती ही की, कोणत्याही आधुनिक उपकरणाचा वापर करताना नागरिकांनी तेवढी काळजी देखील घ्यायला हवी.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम