नाशिक प्रतिनिधी : तिसऱ्या लाटेत नाशिकमध्ये रुग्णांची संख्या प्रचंड वाढली असून. पंधरा दिवसांत
मोठ्या प्रमाणावर रुग्णांची वाढ झाली आहे, चार अंकांवर रुग्णसंख्या पोहोचली आहे. दुसरीकडे दिलासादायक बाब अशी की, जशी लाट अचानक वाढली आहे तशाच्या संख्येने करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जे नुकसान झाले ते या लाटेमध्ये दिसून येत नाही.
दिवसभरात नाशिक जिल्ह्यात 2 हजार 589 नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 हजार 376 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली.
आज वाढलेल्या रुग्णांमध्ये नाशिक मनपा क्षेत्रातील 1 576 समावेश आहे. तर नाशिक ग्रामीणमधीलही आज रुग्णसंख्या वाढलेली असून आज ग्रामीण भागात 881 नवे रुग्ण आढळले आहेत.
मालेगाव मनपामध्येही रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली असून आज दिवसाअखेर 34 रुग्ण आढळले आहे. दुसरीकडे जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्यादेखील वाढलेली असून जिल्हाबाह्य रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज दिवसाखेर जिल्हाबाह्य 98 रुग्ण बाधित आढळले आहेत. नाशिक मनपा क्षेत्रात आज दोन रुग्णांचा करोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 8 हजार 776 वर पोहोचली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम