नाना पटोलेनवर गुन्हा दाखल करा देवळा भाजपा आक्रमक

0
46
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बाबत हीन दर्जाचे वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक लांडगे यांना निवेदन देतांना भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण आदी (छाया -सोमनाथ जगताप )

देवळा प्रतिनिधी : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा,या मागणीचे निवेदन आज मंगळवारी( दि १८)रोजी भाजपाचे देवळा तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे .

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बाबत हीन दर्जाचे वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक लांडगे यांना निवेदन देतांना भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण आदी (छाया -सोमनाथ जगताप )

निवेदनाचा आशय असा की ,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतांना भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचे संतापजनक वक्तव्य केले . हे वक्तव्य हीन दर्जाचे व कॉंग्रेसची घाणेरडी मानसिकता दर्शविणारे आहे . एकीकडे पंतप्रधान पंजाबमध्ये गेले असतांना पंजाब कॉंग्रेसकडून पंतप्रधानांच्या हत्तेचा झालेला फट सुरक्षारक्षकांनी उधळून लावला . तर इकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पंतप्रधानांना मारण्याची व शिव्या देण्याची भाषा करतात . हे निंदणीय आहेच . परंतू पंतप्रधानाच्या सुरक्षेशी निगडीत व अतिसंवेदनशिल विषय आहे . त्यामूळे पोलीसांनी कुण्या पक्षासाठी न काम करता , अशा प्रवृत्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा .असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे .

निवेदनावर तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण , सोपान सोनवणे, हर्षद मोरे ,दिशांत देवरे , विजय आहेर, सागर शिंदे, शेखर आहेर आदींच्या सह्या आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here