दहिवड गावात कोरोनाचा पुन्हा शिरकाव ; मंगळवारी तब्बल१२ अहवाल पॉझिटिव्ह

0
63

देवळा प्रतिनिधी : तालुक्यात सुरुवातीला कोरोना हॉटस्पॉट असलेल्या दहिवड गावांत आज (दि १८) रोजी पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत एकाच दिवशी तब्बल १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे . आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी (दि १७) रोजी २३७ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. याचा अहवाल आरोग्य विभागाला मंगळवारी (दि १८) रोजी सकाळी प्राप्त झाला.

यात एकूण १८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ सुधीर पाटील यांनी दिली. गावनिहाय पॉझिटिव्ह रुग्ण पुढीलप्रमाणे – दहिवड – १२, वसाका -१,उमराणे-१,रामेश्वर-१,मेशी -३ याप्रमाणे आहेत .
कोरोनाचा नवा व्हेरियंट मध्ये मृत्यूचे प्रमाण नगण्य असून, नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, सामाजिकअंतर राखावे असे आवाहन प्रशासनाणे केले आहे .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here