‘लव्ह मॅरेज’ करूनही लग्नाच्या दुसऱ्या दिवशी प्रियसी पलटली अन प्रियकराची आत्महत्या

0
11

द पॉईंट नाऊ ब्युरो : लग्न म्हटले की जन्मोजन्मीचे बंधन समोर येत असतात मात्र, सध्या लग्नात फसवणुकीचे प्रकार जास्त व्हायला लागले आहेत. जालना जिल्ह्यातील जुना जालना शहरात दीपक राजेंद्र तिळवणे या 23 वर्षीय तरुणाचे परिसरात राहणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणी सोबत अफेअर होते. दिपकच्या आई वडिलांनी त्याचा विवाह काही दिवसांपूर्वी दुसऱ्या ठिकाणी जमवल्याने, ह्या वीस वर्षीय तरुणीने दिपकचे घर गाठत आपल्यात आणि दीपक मध्ये प्रेम संबंध असल्याने आम्ही एकमेकांना सोडून जागु शकत नसल्याचे सांगत दीपकच्या आई वडिलांना सांगून त्याचा दुसऱ्या ठिकाणी जमलेला विवाह मोडला. दीपकने देखील आपला विवाह या तरुणीसोबत करावा असा आग्रह धरला. घरच्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दीपक व गायत्री यांनी घरच्यांचा विरोध झुगारून हिंदू पद्धतीने शहरातील एका मंदिरात जाऊन लग्नाचा बँड वाजवून टाकला.

दोघांच्या संमतीने विवाहानंतर गायत्री हिने आपण सज्ञान असल्याचे सांगत आपण स्वतःच्या मर्जीने दीपक सोबत विवाह करत असल्याचा बॉण्ड पेपर वर करारनामा ही लिहून दिला. लग्नानंतर दीपक आणि गायत्री रात्री दिपकच्या घरी गेले. घरच्यांनी दीपकचे लग्न मान्य करत मुलाच्या इच्छापूर्तीसाठी या लग्नास मान्यता देत गायत्रीचा रूढी, प्रथांप्रमाणे विधिवत तिचा स्वीकार ही केला. घरात स्वागत झाले अन सर्वकाही ठीक होण्याची स्थिती असतांनाच मासी शिंकली.

हा विवाह मात्र क्षणिक ठरला, लग्नाला काही तास होत नाही. तोच गायत्रीच्या नातेवाईकांनी दीपकचे घर गाठत गायत्रीला सोबत घेऊन आम्ही तुमचं आमच्या पद्धतीने पुन्हा सकाळी लग्न लावून देतो सांगत गायत्रीला वाहनात घेऊन गेले. मात्र, आज सकाळी कदीम जालना पोलिसांनी दीपक आणि त्यांच्या कुटूंबियांना बोलावून घेत हे लग्न गायत्रीला मान्य नसल्याचे सांगत तिचा नांदण्यास नकार असल्याचे सांगताच दीपक आणि त्यांच्या कुटूंबियांना या संपूर्ण प्रकरणामुळे धक्का बसला.
अन क्षणात होणत्याचे नव्हते झाले त्याच्या पायाखालची वाळू सरकली.

आपल्या पत्नीवर दबाव टाकून तिच्या नातेवाईकांनी हा प्रकार घडवून आणल्याचे दिपकने पोलिसांना सांगितले. मात्र, गायत्री सज्ञान असल्याने तिने तिचा निर्णय घेतला असल्याचे सांगताच दीपक ने घर गाठून विषारी औषध प्रशासन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दीपक ने विष प्रश्न केल्याचे कळताच त्याच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी जालना हॉस्पिटल मध्ये दाखल केले असून त्या ठिकाणी त्यावर उपचार सुरू आहेत. मात्र प्रेमात असे दबाव टाकून आयुष्याशी खेळण्याचे प्रकार होत असल्यास समाजासाठी हे अतिशय निंदनीय असून, याचा विचार होणे गरजेचे आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here