आता होमगार्ड चालवणार एस. टी. महामंडळाच्या बस?

0
14

द पॉईंट नाऊ ब्युरो : एस. टी. महामंडळाच्या थांबलेल्या बस आता होमगार्ड चालवणार का? असा प्रश्न निर्माण झालाय. त्याचं कारणही तसंच आहे. होमगार्ड विकास समिती याबाबतची मागणी परिवहन मंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यभरात चार हजार होमगार्ड तयार आहेत. लालपरीची स्टेरिंग आता होमगार्डच्या हाती द्यावी अशी मागणी होमगार्ड विकास समिती करणार असल्याचे बोलले जात आहे.

सध्या एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अजून सुरूच आहे. या कारणाने अजूनही बस थांबलेल्या आहेत. आणि त्याचा मोठा तोटा एस. टी. महामंडळाला सहन करावा लागत आहे.

याच कारणास्तव जोपर्यंत संप मिटत नाही. तोपर्यंत राज्यभरातील चार हजार होमगार्ड लाल परीचे स्टेरिंग आपल्या हाती घेऊन शासनास मदत करण्यास तयार आहेत. असे होमगार्ड विकास समितीने म्हटले आहे. या होमगार्ड जवनांकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना देखील आहे. तसेच राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तर, राज्यातील होमगार्डची त्याजागी नेमणूक करावी, अशी तरतूद देखील राज्याच्या होमगार्ड अधिनियमात असल्याचं सांगितलं आहे. शासनाने आदेश काढताच सर्व होमगार्ड कामावर हजर होतील, असे संघटनेने म्हटले आहे.

आता यावर शासन काय विचार करते आणि संपकरी एस. टी. कर्मचारी काय विचार करतात. हे लवकरच समजेल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here