विमानतळ ड्रोन हल्ल्यात दोन भारतीयांचा मृत्यू

0
9

द पॉईंट नाऊ ब्युरो : विमानतळावर झालेल्या हल्ल्यात दोन भारतीयांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

संयुक्त अरब अमिराती येथील अबु धाबी विमानतळावर ड्रोन हल्ला करण्यात आला. यावेळी विमानतळावर तीन इंधनाच्या गाड्या उभ्या होत्या. या तीनही गाड्यांना या स्फोटात आग लागल्याने तीन नागरिकांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत. तिघा मृतांमध्ये दोन भारतीयांचा आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे.

सध्या दहशतवादी संघटनांद्वारे आता हल्ल्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जात आहे. ज्यात आता ड्रोन हल्ल्याचा देखील समावेश आहे. ड्रोन ही आधुनिक पद्धत आता युद्धामध्ये वापरण्याचा विचार केला जात आहे. मात्र कोणतीही आधुनिक पद्धत अनिष्ट वृत्तीच्या लोकांच्या हाती लागल्यावर काय परिणाम होतो, त्याचा प्रत्यय अबू धाबी येथील या हल्ल्यामुळे आला.

हा हल्ला आपणच केल्याचा दावा यमनच्या हाऊती बंडखोरांनी केला आहे. मात्र आता याबाबत अधिक माहिती तपासाअंतीच निष्पन्न होईल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here