मालेगाव मध्ये ‘काळाबाजार’ ; काँग्रेसच्या मा.आमदार भावाचा असाही प्रताप

0
35

नाशिक ब्रेकिंग
मालेगाव प्रतिनिधी: मालेगाव मध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई केली असून अनधिकृत पणे सुरू असलेला बायोडिझेल पंपावर छापा टाकण्यात आला आहे. हा पंप काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांचा भाऊ जलील शेख चालवत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

ही धाडसी कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांनी ही कारवाई केली आहे. शेख यांच्या मालकीच्या हॉटेल मागे पत्र्याच्या शेड मध्ये अनधिकृत पणे डिझेल पंप उभा केलेला होता. या पंपाची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला.

इतरत्र मिळणाऱ्या किमतीपेक्षा कमी किमतीत म्हणजे १५ ते २० रुपये कमी दराने बायोडिझेल विकत असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाई मुळे पुन्हा एकदा मालेगाव चर्चेत आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here