खर्डे विभागात कोरोनाचे सात रुग्ण ; घरीच विलगीकरणाचा सल्ला

0
133

देवळा प्रतिनिधी : खर्डे येथे कोरोनाचे सात रुग्ण आढळून आले असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घरीच विलगिकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र संबंधित रुग्ण घराबाहेर फिरतांना दिसत असल्याने ते सुपर स्पेडर ठरू शकतात. अशी माहिती खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ अलका सपकाळे यांनी आज (दि१७) रोजी दिली.

कोरोनाने तिसऱ्या लाटेत डोके वर काढले असून, ग्रामीण भागात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे . खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांची कोरोना करण्यात येत असून, गेल्या दोन दिवसात सात जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घरात विलगिकरणाचा सल्ला दिला आहे. मात्र ,संबंधित रुग्ण बिनदिक्कत घराबाहेर फिरतांना दिसत असल्याने ते सुपर स्पेडर ठरू पहात असल्याची भीती आरोग्य विभागाकडून वर्तवली जात आहे. कोरोनाचे सिमटन्स जरी दिसत नसले तरी पण पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनी स्वतःची व परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे.

याबाबत आरोग्य विभागाने पॉझिटिव्ह रुग्णांची यादी ग्रामपंचायतीकडे दिली आहे . सध्या वातावरणातील बदलामुळे सर्दी ,ताप, खोकला या आजाराचे रुग्ण दिसून येत आहेत . नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी , मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, स्वच्छता पाळावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ अलका सपकाळे यांनी शेवटी केले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here