देवळा प्रतिनिधी : नगरपंचायत निवडणुकीत प्रामाणिकपणे लढत आहोत मात्र आम्हाला संघर्ष करावा लागतोय पैशाकडे बघून मतदान होतय हे दुर्दैवी आहे, पवित्र मतदान विकले जात असेल तर त्यापेक्षा दुर्दैवी काय आहे. देवळा शहराचे विकासात्मक धोरण आम्ही मांडले आहे अन ते येत्या पाच वर्षात पूर्ण करायचे आहे सुज्ञान नागरिकांनी साथ देणं गरजेचं आहे. या वॉर्डाचा कायापालट करायाचा असेल तर निवडणूक द्या असे आवाहन देखील आहेर यांनी केले.
सभेच्या सुरवातीलाच आहेर यांनी समोरील उमेदवारांना व्यासपीठावर येण्याचे आवाहन करून आक्रमक असल्याचे दाखवून दिले, सभेत आहेर बोलतांना पुढे म्हणाल्या आयुष्यात अनेकवेळा संघर्ष केला अन तो आजही करतोय, मात्र जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी उभे आहोत कायम उभे राहू, लोकांना धमकावून मतदान मागताय पण आम्ही तुमच्या पायापडून मतदान मागतोय हा आशीर्वाद द्या, पवित्र मताची पायमेली होऊ देऊ नका. विक्री होऊ देऊ नका असे भावनिक आवाहन देखील आहेर यांनी केले.
अश्विनी आहेर पोटतिडकीने बोलत असतांना अश्रू अनावर झाले यावेळी उपस्थिततांच्या डोळ्यात देखील पाणी आल्याने ही सभा काही काळ भावनिक वळणावर येऊन ठेपली.
‘द पॉईंट नाऊ’च्या बातमीवर संताप…
”होममिनिस्टरांच्या सभेसाठी उठसुठ सभा” या शीर्षकाखाली काल आम्ही बातमी प्रसिद्ध केली, या बातमीत वास्तव परिस्थिती मांडण्यात आली. मात्र आहेर यांनी या बातमीचा दाखला घेत प्रत्येक मुद्दा खोडण्याचा प्रयत्न केला, मुद्यांना उत्तर दिल्याने नागरिकांच्या मनातील अनेक गैरसमज दूर झालेत. राजकारण्यांसोबत पत्रकारांना देखील सभेत खडसावल्याने त्यांची निर्भीडता पुन्हा अधोरेखित झाली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम