देवळा प्रतिनिधी : देवळा तालुक्यातील वासोळ येथे दि.१६ रोजी लघू पाटबंधारे योजनेतून कोलती नदीवर मंजूर झालेल्या बंधाऱ्याच्या बांधकामाचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष केेदा आहेर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.
हा बंधारा केदा आहेर यांच्या विशेष परिश्रमातून मंजूर करण्यात आला असून स्थानिक नागरिकांचा उन्हाळ्यातील पाणी प्रश्न सुटनार असल्याने शेतकऱ्यांनी केदा आहेर यांचे आभार मानले आहेत. याप्रसंगी परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या आहेर यांनी जाणून घेत विविध विकास कामांच्या मुद्यांवर शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशोक निकम, विजय पवार, ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते रमेश सुर्यवंशी, लहुसिंग गिरासे सोसायटीचे माजी अध्यक्ष महारू गिरासे, पोलिस पाटील, कैलास खैरनार, शशिकांत भामरे, दरबार गिरासे, ललित भामरे, शिवाजी अहिरे आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम