जातपंचायतीच्या लोकांचा संतापजनक प्रकार

0
50

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (सांगली) : विवाह हा माणसाच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा भाग असतो. मात्र याच विवाहाबाबत अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे.

आंतरजातीय विवाह केला म्हणून 150 जोडप्यांना थेट वाळीत टाकल्याचा संतापजनक प्रकार सांगली जिल्ह्यात घडला आहे. नंदिवाले समाजातील जात पंचांनी हा संतापजनक प्रकार केला असल्याने, संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाह म्हटला म्हणजे दोन व्यक्तींचे एकमेकांच्या आयुष्याशी जोडले जाणे असते. त्यात आता आजच्या या नवीन पिढीत विवाहामध्ये जात – पात या गोष्टी मानल्या जात नाहीत. आणि आता ते आवश्यक देखील नाही. मात्र गैर विचारांच्या आहारी गेलेल्या या पंचांनी या जोडप्यांना थेट वाळीत टाकल्याने संबंधित जोडप्यांना खुप त्रास सहन करावा लागला. याच कारणास्तव काही जोडप्यांनी मिळून अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर, संबंधितांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजच्या या काळात देखील असे प्रकार घडत असल्याने, आश्चर्य आणि चिंता देखील व्यक्त केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here