प्रविण आहेर, प्रतिनिधी
देवळा : येथील तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी दत्तात्रय शेजुळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राजेश हेकडे यांची नुकतीच बदली झाली आहे.
देवळा तालुक्याचे तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांची नुकतीच बदली झाली असून , मालेगाव येथे धान्य वितरण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोविड १९ काळात हॉटस्पॉट ठरलेल्या देवळा तालुक्यात आपल्या कौशल्यातून जबाबदारी हाताळत कोरोना नियंत्रनात आणण्यासाठी अहोरात्र झटणारे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांची बदली होऊन दिंडोरी तालुका आरोग्य अधिकारी पदी नियुक्ती झाली.
गेल्या ३ ते ४ वर्षापासून देवळा तालुक्याच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी कोणत्याही आमिषाला बळी न पडता गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तत्पर असणारे देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांची नुकतीच बदली झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात नियुक्ती झाली आहे.
देवळा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राजेश हेगडे यांचीही नुकतीच औरंगाबाद येथे बदली झाली आहे. त्यांच्या कार्यकाळात महावितरणमध्ये अनेक चांगल्या योजना उपक्रम राबविण्यात आले होते.
तालुका प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदली झाल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी वर्गाची अच्यानक सगळ्यांची बदली झाल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम