देवळा प्रतिनिधी : कोरोनाने थैमान घातले असून तालुक्यात तिसऱ्या लाटेत करोनाचा उद्रेक वाढताना दिसून येत आहे. शनिवारी ३२ नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात भूमी अभिलेख कार्यालयात (Deola land records office) तीन कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
भूमिअभिलेख कार्यालयाशी संपर्कात असणाऱ्या नागरिकांनी त्वरित आपली करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे. भूमि अभिलेख कार्यालयात नेहमीच वर्दळ असते यामुळे नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाने डोके वर काढले आहे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी ( दि. १५) रोजी तब्बल ३२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात शुक्रवारी (दि. १४ ) रोजी २१ कोरोना रूग्ण आढळून आले होते. गुरुवारी (दिनांक १३) रोजी देखील एकाच दिवशी १० रुग्ण तालुक्यात आढळून आले होते. तालुक्यात शनिवारी रोजी एकूण ८५ रुग्ण कोरोना बाधित असून, रोजचा आकडा पाहता कोरोना बाधितांची शतकाकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शनिवारी आढळून आलेले गावनिहाय रुग्ण पुढील प्रमाणे
देवळा – १६, उमराणे -२, गुंजाळ नगर- २, मेशी-१, दहिवड-५, माळवाडी- १, रामेश्वर-२, वाखारी-१, सटाणा-१, मालेगांव-१ याप्रमाणे आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम