द पॉईंट नाऊ ब्युरो : हो! तुम्ही ऐकलत ते खरच आहे. युरोपियन देश स्पेनने देशात आता मास्क लावण्याची आणि लस घेण्याची सक्ती सुद्धा हटवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
कोरोनाने आत्तापर्यंत सर्वांनाच हैराण केले आहे. त्यात सध्या कोरोनाच्या ओमीक्रॉन प्रकाराने त्रस्त केले आहे. यामुळे सगळीकडेच लोकांना कोरोना साठीचे नियम अधिक सक्तपणे पाळण्याच्या सूचना केल्या जात आहेत. मात्र स्पेन या देशात हे वेगळीच बाब समोर येते आहे.
स्पेन या देशाने आता कोरोनाला सामान्य फ्लू मानले आहे. त्यामुळे इथले सरकार आता कोरोनामुळे घालण्यात आलेले सर्व निर्बंध हटवणार असल्याचे सांगितले जात आहे. आता याबाबत काय ते चित्र लवकरच स्पष्ट होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम