देवळा प्रतिनिधी : देवळा तालुक्यात तिसऱ्या लाटेत कोरोनाचा उद्रेक वाढताना दिसून येत असून, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आज शनिवारी( दि १५) रोजी तब्बल ३२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यात शुक्रवारी (दि. १४ ) रोजी २१ कोरोना रूग्ण आढळून आले होते .गुरुवारी (दिनांक १३) रोजी देखील एकाच दिवशी १० रुग्ण तालुक्यात आढळून आले होते. त्या नंतर आज प्राप्त अहवाल नुसार ३२ रुग्ण म्हणजे तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे हे जिवंत उदाहरण आहे. तालुक्यात आज रोजी एकूण ८५ रुग्ण कोरोना बाधित आहेत. मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी, हा विषाणू वेगाने पसरत असल्याने तालुका आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे.
आज आढळून आलेले गावनिहाय रुग्ण पुढील प्रमाणे
देवळा – १६,
उमराणे -२,
गुंजाळ नगर- २,
मेशी-१,
दहिवड-५,
माळवाडी- १,
रामेश्वर-२,
वाखारी-१,
सटाणा-१,
मालेगांव-१ याप्रमाणे आहेत .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम