‘तो’ रात्रीचा हल्ला जमिनीच्या वादातून ; संशयित ताब्यात

0
32
खैरनार यांच्यावर हल्ला झाला ते ठिकाण. (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा प्रतिनिधी : तालुक्यातील गिरणारे शिवारातील धिंडेश्वर मळ्यात वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यावर अज्ञात व्यक्तींनी बुधवारी (दि १२) रात्रीच्या सुमारास जीवघेणा हल्ला केला. यात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला मालेगाव येथील खासगी दवाखान्यात उपचारार्थ पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणी सुनिल सुभाष खैरणार, व विलास सुभाष खैरणार ( रा. दाभाडी, ता – मालेगाव ) ह्या संशयितांवर देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विलास खैरणार यास पोलिसांनी अटक केली आहे. सदरची घटना हि वडीलोपार्जीत जमीनीच्या वाटपावरून असलेल्या वादामुळे घडली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गिरनारे ता देवळा येथील धिंडेश्र्वर मळ्यात चिंतामण गटलू खैरणार ( वय ४५) हे आई, वडील, पत्नी, चार मुली यांच्यासोबत वास्तव्यास आहेत. बुधवार दिनांक १२ रोजी ते घराबाहेरील पडवीत झोपलेले असताना रात्री साडे अकराच्या सुमारास अज्ञात दोन इसमांनी खैरनार यांच्यावर प्राणघातक शास्त्रांनी हल्ला केला. यात त्यांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. हल्ल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. यावेळी त्यांच्या आईने आरडाओरड केल्याने उर्वरित कुटुंबीय घराबाहेर आले. जखमी अवस्थेत त्यांना मालेगाव येथील खाजगी दवाखान्यात उपचारार्थ पाठवण्यात आले असून देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विक्रांत कचरे, निलेश सावकार, विजय सोनवणे, मोठाभाऊ बच्छाव आदी करीत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here