वीरजवानाच्या मृत्यूने हळहळ ; लेकीचा ‘बाबा’ म्हणून आवाजही ऐकू शकला नाही

0
108

नाशिक प्रतिनिधी : देश सेवेसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या अवलियाचा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय नांदगांव तालुक्यातील बोलठाण येथील मुळ रहिवासी असलेल्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण आले आहे. अमोल हिम्मतराव पाटील (30) असे जवानाचे नाव आहे. विजेच्या तारांचा धक्का लागल्याने अमोल याचा मृत्यू झाला आहे.

विरजवान सशस्त्र सीमा बल नेपाळ येथील विरपूर सीमेवर अमोल कर्तव्यावर असतांना मृत्यू झाला असून. मकर संक्रांतीच्या दिवशी अमोलसह अन्य दोघांना देखील वीरमरण आले आहे. यामुळे एकूणच सैन्यदलात शोककळा पसरली आहे…

गेल्या सहा वर्षांपूवी सशस्त्र सीमा दलात दाखल झालेला अमोल दिवाळी सणाच्या वेळी आपल्या गावी बोलाठाण येथे आला होता. त्यावेळी त्याने परिवाराला सोबत नेले होते. अमोल यास पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, अविवाहित भाऊ असा परिवार आहे. अमोलचे पार्थिव बोलठाण येथे आणले जाणार असून त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

नांदगाव सह पंच क्रोशीतील नागरिकांची संक्रांत मात्र गोड न होता कडू झाली आहे. या जवानाच्या मृत्यूने नातेवाईकांसह गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here