चांदवडच्या कृषी सहाय्यक स्वाती झावरे यांचा सन्मान

0
187

नितीन फंगाळ
चांदवड प्रतिनिधी : प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना कार्य करत असतो त्यावेळी आपला कुणी गौरव करावा म्हणून नाही तर ते आपले कर्तव्य म्हणून पण असं असतानाही जेव्हा अनपेक्षितपणे कौतुकाची थाप जेव्हा आपल्या पाठीवर पडते तेव्हा आपल्यात दहा हत्तीचं बळ येत. उमंग महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा विद्याताई आहेर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत क्षितिजा महिला सन्मान देऊन गौरव केला.

सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मा.आरोग्य मंत्री तथा महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या अध्यक्ष पुष्पाताई व्यंकटराव हिरे यांच्या सह बारामती एग्रीकल्चर चा विश्वस्त सुनंदा राजेंद्र पवार, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या विश्‍वस्त मीनाताई भुजबळ यांना उमंग महिला फाउंडेशन तर्फे महिला विशेष जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.उमंग महिला फाउंडेशन तर्फे शनिवारी दि. (8/1/2022) विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा संजीवनी बँक्वेट हॉल येथे क्षितिजा महिला पुरस्काराने अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड, अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग, सवि फाउंडेशन च्या अध्यक्षा सविता व्होरा, सामाजिक कार्यकर्त्या निना जाधव, सुरेखा भालेराव, डॉ.शीतल गुप्ता यांना क्षितिजा विशेष महिला पुरस्कार प्रदान करण्यात आला.तसेच इतर विविध क्षेत्रातील 20 महिलांना गौरवण्यात आले. यावेळी चांदवड येथे कार्यरत असलेल्या कृषी सहाय्यक स्वाती झावरे या देखील या पुरस्काराची मानकरी ठरल्या. कृषी क्षेत्रात ऑनलाईन शेतीशाळा (सोयाबीन) घेऊन विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रतील रिसोर्स पर्यंत पोहचणे त्यांनी जी टेक्नॉलॉजि वापरली ती टँक्नोलॉजी सहजा सहजी कोरोना काळात शेतकऱ्यांनपर्यंत पोहचवली. यशस्वी महिलाचे सहलीचे आयोजन ,ऑनलाईन बीजप्रक्रिया स्पर्धेत शेतकऱ्यांना भाग घ्यायला उत्स्फूर्त करून त्यांचे जिल्हास्तरावर दोन नंबर देखील आलेले आहेत. कृषी विभागात विविध योजना शेकर्यांकडून राबवून घेण्यात कायम अग्रेसर असतात. सर्व महिलांना सोबत घेऊन काम करणे हे त्यांचे गुण वैशिष्ट्य,कृषी सहाय्य्क म्हणून कार्य करताना त्यांना सर्व सहकारी तसेच तालुका कृषी अधिकारी चांदवड श्री.विलास सोनवणे व सहकारी वर्गाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here