द पॉईंट प्रतिनिधी: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सध्यालॉर्ड्स सुरू आहे. आणि यात आज या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी चा शेवटचा दिवस असल्याने, सर्वांचे लक्ष याकडे लागून राहिले आहे.
भारताने आज इंग्लंड समोर विजयासाठी २७२ धावांचे लक्ष ठेवले आहे. त्यात शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत इंग्लंडने ७५ धावांत ५ गडी गमावले होते. त्यामुळे दुसरा कसोटी सामना देखील चुरशीच्या क्षणी जाऊन पोहोचला आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात भारताला विजयाची संधी असतांना, शेवटच्या दिवशी पावसाच्या व्यत्यय्याने कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. त्यानंतर या कसोटी सामन्यात देखील पावसाने बऱ्याच वेळा दखल दिल्याने, शेवटच्या दिवशी नेमके काय होते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भारताकडून
सलामीवीर के. एल. राहुल या कसोटी मालिकेत पुरता फॉर्मात असतांना, कर्णधार विराट कोहली मात्र आउट ऑफ फॉर्म चालत असल्याने सर्व स्तरातून टीका केली जात आहे. त्यात कर्णधार विराट कोहलीचे डी. आर. एस. च्या बाबतीत निर्णय चुकीचे ठरल्याने कर्णधार विराट कोहलीला दिग्गज क्रिकेट खेळाडूंसह चाहत्यांकडून देखील लक्ष केले जात आहे.
या सुरू असलेल्या कसोटी सामन्यात निकाल नेमका काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर हा कसोटी सामना सुरू आहे. त्यामुळे या कसोटी सामान्या कडे सर्वांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे.
लॉर्ड्स वर सुरू असलेल्या या सामन्याने वेगवेगळ्या कारणांमुळे लक्ष वेधून घेतले होते. प्रेक्षकांचे के. एल. राहुल वर शंपेन चे झाकण फेकणे असेल, इंग्लंडच्या खेळाडूंचे चेंडू सोबत पायाने छेडछाड असेल, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे हा सामना चर्चेत राहिला आहे. त्यामुळे भारताच्या बाजूने निकाल लागणार की इंग्लंडच्या बाजूने की सामना पुन्हा अनिर्णित राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आता या सामन्याचे भवितव्य काय? निकाल कोणाच्या बाजूने लागणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. ही कसोटी मालिका वर्ल्ड कसोटी सिरीज चा भाग असल्याने भारतीय चाहत्यांकडून खूप अपेक्षा व्यक्त केल्या जाताय. मागील कसोटी वर्ल्ड सिरीज अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडने पराभूत केले होते. त्यामुळे या वेळी तरी भारतीय संघ काही वेगळा निकाल दाखवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम