पतंग उडवणे पडले महागात ; चिमुरड्याचा मृत्यूने हळहळ

0
15

जळगाव ब्युरो : आज मोठ्या उत्साहात मकरसंक्रांत निमित्‍ताने पतंगोत्‍सवाचा आनंद लहानांसह मोठेही घेत असतात. अनेक ठिकाणी सकाळपासून मोकळ्या मैदानात पतंग उडवित असल्‍याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, मात्र हाच आनंद जळगाव जिल्ह्यात क्षणात विरला. दहा वर्षीय मुलाच्‍या मृत्‍यूने कुटूंबावरच दुःखाची संक्रांत ओढवली आहे.

जळगाव शहरापासून जवळ असलेल्‍या कुसुंबा गावात ही घटना घडली. पतंग उडवत असताना दहा वर्षीय मुलाचा विजेच्या तारेला धक्‍का लागल्यामुळे मृत्यू झाला. हज दुर्दैवी घटना आज दुपारी बाराच्‍या सुमारास घडली. यामुळे गावांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हितेश ओंकार पाटील (वय 10) असे मृत मुलाचे नाव आहे. हितेश मित्रांसोबत मोकळ्या मैदानात पतंग उडवायला गेला होता. पतंग (Kite) उडवीत असताना विजेच्या तारांमध्ये अडकला. चिमुरड्या पतंग काढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला विजेच्या तारेचा शॉक लागला.

ग्रामस्थांनी त्यास तात्‍काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Jalgaon Medical Collage) व रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल कळसकर यांनी त्यास मृत घोषित केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here