अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांची प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट

0
45

स्वप्निल आहिरे,
आराई प्रतिनिधी : गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र अंबासन येथे कुटुंब कल्याण शिबिर अंतर्गत योगिता जाधव ह्या महिलेकडून गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेसाठी सर्जन डॉक्टर यांनी चार हजार रुपये घेतले. ही बातमी ‘द पॉईंट नाऊ’ च्या हाती लागली म्हणून सदर महिलेला न्याय मिळणेसाठी सदर बातमी प्रसिध्द करण्यात आली. बातमीची दाखल घेत दि.१२ वार बुधवार रोजी जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ.युवराज देवरे यांनी सदर प्रकरणाची चौकशी करणेसाठी भेट दिली.

ग्राम पंचायत कार्यकारणी ने त्यांना निवेदन दिले व निवेदनात दोषींवर कठोर कारवाई करावी. चौकशी निष्ठेने करून कोणालाही पाठीशी घालू नये. दोषींवर गुन्हा दाखल करावा. येथील काही कर्मचारी आपल्या मनाने येथे कारभार चालवता अशा कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करावी. परंतु चोर सोडून संन्याशाला फाशी असा प्रकार करू नये. अशा प्रकारचे निवेदन डॉ.युवराज देवरे यांना देण्यात आले.

त्या संदर्भात ग्राम पंचायत सरपंच व कार्यकारणी यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविले व सरपंच व सदस्य यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलवण्यात आले. ग्रामपंचायत कार्यकारणी यांच्याशी सदर प्रकरणाबाबत चर्चा करून घेतली. नंतर त्यांनी सर्व आरोग्य कर्मचारी यांना एक एक करून दालनात बोलवले व चौकशी करून तसे त्यांचे लेखी स्वरूपात जबाब घेतले. तद्नंतर पुन्हा ग्राम पंचायत कार्यकारणीची बैठक घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

सदर प्रकरणाची चौकशी करणे साठी डॉ.देवरे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन थेट ज्या महिलेकडून पैसे घेऊन शस्त्रक्रिया केली त्या योगिता जाधव यांचे माहेर विराने तालुका मालेगाव येथील घरी जाऊन त्यांच्याकडून सदर प्रकरणाची चौकशी करून घेत त्यांचा लेखी स्वरूपात जबाब नोंदवून घेतला.

प्राथमिक आरोग्य केंद्र अंबासन येथे जो काही प्रकार घडला त्याची योग्य प्रकारे चौकशी करून कर्मचारी यांचे लेखी स्वरूपात जबाब घेतले आहेत. याचा अहवाल तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल व संबंधितांवर कारवाई केली जाईल – युवराज देवरे जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी नाशिक

आम आदमीचे जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी यांना निवेदन
सदर प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि सदर शिबिरातून पैसे घेऊन शस्त्रक्रिया केली असे अजून किती रुग्ण आढळतील याची सखोल चौकशी व्हावी. जर आपण दोषींवर कारवाई केली नाही तर आरोग्य केंद्राला कुलूप लावून आमरण उपोषण करू. जो पर्यंत दोषींवर कारवाई केली जात नाही तो वर उपोषण मागे घेणार नाही. – योगेश कोर आम आदमी पार्टी सचिव बागलाण

आरोग्य केंद्रात मागील महिन्या पासून तर आता पर्यंत झालेल्या कुटुंब कल्याण शिबिरात सहभागी झालेल्या रुग्ण यांची यादी तपासून कुणा कडून किती पैसे घेऊन शस्त्रक्रिया करण्यात आली याची सखोल चौकशी करावी – विजय गरुड, ग्रामपंचायत सदस्य


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here