बेज – महात्मा फुले विद्यालयाच्या विद्यार्थिनी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

0
12

जगदीश पवार

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (बेज) : मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित बेज येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकताच शिष्यवृत्ती परीक्षेचा प्रसिद्ध झालेला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती गटाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. विद्यालयातून पायल समाधान पवार ५४.६६%, अनुष्का समाधान पवार ५४.००% या विद्यार्थीनी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत पात्र ठरल्या आहेत.

यशस्वी विद्यार्थीनींना विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक बागुल पी. एम, पर्यवेक्षक खरे आर. डी, यांच्या प्रेरणेने एच. एस.आहेर, एम टी. आहेर, आहेर यु.एस, पवार बी.आर, लाडे जे. पी, सुरकर आर. एम यांनी मार्गदर्शन केले.

या सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे म. वि. प्र. समाज संस्थेचे कळवण व सुरगाणा कार्यकारिणी सदस्य अशोक पवार यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here